दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तींनाही ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार?

राजस्थान -विधेयक मंजूर

  • Rajasthan Panchayati Raj (Amendment) Bill, 2026
  • राजस्थान विधानसभेने पंचायत निवडणुकांतील दोन मुलांची अट रद्द करणारे विधेयक मंजूर केले.
  • या दुरुस्तीमुळे दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तींनाही ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार आहे.
  • ही अट सन १९९५ मध्ये लागू करण्यात आली होती.
  • त्या वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भैरोंसिंह शेखावत होते.
  • राजस्थान पंचायत राज कायदा १९९४ मधील कलम १९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
  • ही अट पूर्वी पंचायत राज संस्था तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू होती.
  • राजस्थानचे पंचायत राज मंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की ही अट त्या काळी लोकसंख्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आली होती.
  • १९९१ ते १९९४ या काळात राज्याचा एकूण प्रजनन दर सुमारे ३.६ होता.
  • सध्या राज्याचा एकूण प्रजनन दर सुमारे २.० झाला आहे.
  • कुटुंब नियोजन, सामाजिक बदल, महिलांचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांमुळे हा दर कमी झाला आहे.
  • काँग्रेस नेते गोविंदसिंह डोटासरा यांनी या बदलामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली.
  • काँग्रेसचे मुख्य सचेतक रफीक खान यांनी पंचायत सीमांकन प्रक्रियेवर आक्षेप घेतला.